नाशिक विमानसेवा 15 एप्रिलपर्यंत स्थगित
नाशिक, दि. 29, मार्च - ओझर विमानतळाहून उडान योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नाशिक मुंबई आणि नाशिक-पुणे विमानसेवेसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवे शेड्यूल्ड जाहीर केले असले तरी आता विमानसेवा देणा-या एअर डेक्कनकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याने ही सेवा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली असल्याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांना उडानसाठी आता 15 एप्रिलनंतरच विमानसेवा सुरू होऊ शकेल.
‘उडे देश का आम आदमी’ या संकल्पनेतून देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘उडान’ ही सेवा गेल्या 15 दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आली. नाशिकसह जळगाव, पुणे, या सेवाही स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे 28 मार्चपासून नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते.
नाशिकमधून विमानसेवा सुरू होण्यासाठी अनेक उद्योजक संघटना, सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणार्या जीव्हीके कंपनीने येण्या-जाण्याच्या आठ वेळा निश्चित केल्या. मात्र, राज्यातील प्रशासनाने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात दिरंगाई केल्याने यातील सहा वेळा गुजरातमधील पोरबंदर, सुरत आणि कांडला विमानतळाने पळवल्या. त्यानंतर पुरेसा स्ला ॅटच उपलब्ध नसल्यानचे कारण दिल्याने ही सेवा पुन्हा अनिश्चिततेच्या चक्रात सापडली. अखेर खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत आंदोलन केल्यानंतर गेल्यावर्षी 23 डिसेंबरपासून सेवेचा शुभारंभ क रण्यात आला. एअर डेक्कन मार्फत 19 आसनी विमानाव्दारे नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे सेवा सुरू करण्यात आली.
सुरुवातीला नाशिक-मुंबई करता पहाटेचा स्लॉट देण्यात आला होता, मात्र कालांतराने तो दुपारचा करण्यात आला. मात्र नाशिककरांना ही वेळ गैरसोयीची असल्याने बहुतांश फे-या रद्द कराव्या लागल्या. आता 27 मार्चपर्यंत ही सेवा स्थगित करण्यात आली. 28 मार्चपासून सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार आज डीजीसीएकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार मुंबईसाठी नाशिकहून सकाळी 6 वाजता, तर पुण्याहून सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी टाईम स्लॉट देण्यात आला आहे. मात्र, आता एअर डेक्कनने प्रशिक्षणाअभावी वैमानिकांची उपलब्धता नसल्याचे कारण देत 15 एप्रिलनंतर सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.