Breaking News

भाजपने केले रस्त्याचे स्वतंत्र उदघाटन


श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी - पालिकेतील सत्ताधारी महाआघाडीतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व पधाधिकाऱ्यानी नुकतेच प्रभाग क्र. १३ मधील ओपन थेटर ते सेंट्रल गोडाऊनपर्यंत तयार झालेल्या रस्त्याच्या कामाचे स्वतंत्रपणे उदघाटन केले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी आधी या रस्त्याचे उदघाटन केले असताना भाजपने पुन्हा स्वतंत्रपणे या रस्त्याचे उदघाटन केले. पालिकेत सत्तेत असलेल्या महाआघाडीत फूट पडली असल्याने पुढील काळात शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, नगरसेविका वैशाली चव्हाण, भारती कांबळे, नगरसेवक दीपक चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष सुनील वाणी, सतीश सौदागर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय यादवआदीसंह नागरिक उपास्थित होते.