एकमेकांवर विविध रंगांची उधळण, परिसरात रंगोत्सवाचा जल्लोष
बुरा न मानो होली है ! म्हणत परस्परांवर रंगांची उधळण करत जामखेड शहरासह व परिसरामध्ये रंगपंचमी मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. रंगोत्सवाच्या निमित्ताने टिमक्यांचा आवाज, सिल्व्हर - गोल्डन रंग लावून रंगवलेले चेहरे, फुगे आणि पिचका़र्या मारून रंगांची उधळण करणारे बालचमू, सुसाट वाहने चालवत स्टंट करणारी मुले, पाण्याच्या फवार्याात नाचणारी तरुणाई असे चित्र पहायला मिळाले. एकमेकांवर गुलालासह रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा करण्यात आला. यामुळे शहर विविध रंगांनी न्हाऊन निघाले होते.
रंग उधळत शुभेच्छांचा वर्षाव रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा. रंगपंचमीच्या शुभेच्छा, असे म्हणत एकमेकांवर रंग उधळत रंगोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र - मैत्रिणींनी परस्परांना भेटून रंगोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला. ठिकठिकाणी भेटत गटागटाने रंगोत्सव साजरा करण्यात आला. बालचमू, तरुण मुले-मुली, महिला व वृद्ध मंडळींचा समूह असे वयोमानानुसार गट करून एकमेकांवर रंगांची उधळण करून एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळपासून रंगोत्सवाला सुरुवात झाली. पिचका़र्या घेऊन बालचमूंनी गल्लीतून येणा़र्या - जाणा़र्या वाहनधारकांवर रंग उडवायला सुरुवात केली. रंगांचे फुगे, कोरडे रंग उधळत स्टंटबाजी करत तरुणाई रंगोत्सवाचा आनंद घेताना दिसत होती. यामुळे सर्व रस्ते रंगमय बनले होते. सकाळी सुरू झालेला रंगोत्सव दुपारी उशिरापर्यंत सुरू होता.