मालमत्ता कर, पाणी बिल भरण्याकरिता सुट्टीच्या दिवशीही ठामपाची प्रभाग कार्यालये सुरु
ठाणे, दि. 27, मार्च - सन 2017 -18 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणी बिल वसुलीचा 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी तसेच महापलिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मालमत्ता क राची, व पाणी बिलाची थकबाकी भरणे सोयीचे होण्याकरिता ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग कार्यालये 26 मार्च ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत क ार्यन्वित ठेवण्यात येणार आहेत. सुट्टीच्या दिवशीही सदरची कार्यालये सुरु राहणार असल्याने नागरिकांनी सन 2017 - 18 या आर्थिक वर्षातील आपला मालमत्ता व पाणी बिल तात्काळ भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.