लोकजागर’च्या सेवा पुरस्काराचे दिमाखात वितरण कवी चांदगुडेंच्या कवितांनी उपस्थित भारावले
कुळधरण:प्रतिनिधी - कर्जत तालुक्यातील राशिनच्या लोकजागर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या लोकजागर उत्कृष्ट सेवा पुरस्काराचे राशिन येथे दिमाखात वितरण करण्यात आले. व्यक्ती तसेच संस्था यांना मिळून १० पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉक्टर फॉर बेगर्सचे डॉ. अभिजित सोनवणे होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत येवले यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे बापूसाहेब सोनवणे, पत्रकार आशिष बोरा आदींची भाषणे झाली. कवी हनुमंत चांदगुडे यांनी विविध विषयावर अत्यंत भावनिक कविता सादर केल्याने उपस्थित भारावून गेले. मोबाईलचे दुष्परिणाम, आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांचे वास्तव त्यांनी मांडले. डॉ. अभिजित सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून जीवनप्रवास मांडला. भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींवर उपचार करताना अशा लोकांना भिक्षेकरीवरून कष्टकरी बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाला जागरणाकडून जागृतीकडे घेऊन जात असताना आलेले अनेक अनुभव त्यांनी कथन केले.
कार्यक्रमासाठी डॉ. विजय गोकुळे, शहाजी राजेभोसले, थेरवडीचे सरपंच वसंतराव कांबळे, उद्योजक बापूसाहेब होले, केंद्रप्रमुख घोरपडे, डॉ. विजय चव्हाण, खंडागळे, युवा नेते निलेश तनपुरे, नानासाहेब राऊत, निवृत्ती ससाने, शरद सुद्रिक, मोहनराव लाढाने, दिपक सुपेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल काळे आणि सुनील मंडलिक यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नामदेव कापसे, सचिव सुशीलकुमार कांबळे, सहसचिव प्रा. विठ्ठल काळे, खजिनदार अशोक बचाटे, सदस्य सुनील मंडलिक यांनी विशेष परिश्रम घेतले. नवीन बोरा, दामोदर साळवे, राहुल मंडलेचा, डॉ. महेंद्र थोरात यांनी विशेष सहकार्य केले. दत्तात्रय कोपनर यांनी आभार मानले.