Breaking News

5 कोटींचा टॅक्स बुडवला; व्यापा-यावर गुन्हा दाखल


पुणे - पुण्यातील एका केमीकल कंपनीच्या मालकाने तब्बल आठ वर्षांपासून 4 कोटी 76 लाख रुपयांचा कर न भरता शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रक रणी संबंधीत व्यापा-यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रमेश टाटिया असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ते कॉन्टिनेंटल सेल्स ण्ड सर्व्हिसेस या कंपनीचे मालक आहेत. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाचे सहाय्यक राज्य कर आयुक्त किरण जाधव यांनी येरवडा येथे फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल टाटिया यांच्या कंपनीने 2009-2010 पासून वस्तू व सेवाकर भरला नसल्याचे उघड झाले होते. त्यांनतर या व्यापा-याची अधिक माहिती घेतली असता आठ वर्षांपासून त्यांनी कर न भरल्याचे निष्पन्न झाले. टाटीया यांनी आतापर्यंत त्यांनी बुडविलेला कर, त्यावरील व्याज व दंड, असे एकूण 4 कोटी 76 लाख रुपयांची सरकारची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार करत आहेत.