Breaking News

शिंदे येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर


डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळदघाट यांचे संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील शिंदे येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 4) शिंदे येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरात अस्थिरोग, स्रीरोग, बालरोग, शल्यचिकित्सा, नेत्रचिकित्सा, एन्जिओग्राफी, कान, नाक, घसा यावरील सर्व शस्रक्रिया केल्या जाणार आहेत. रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन योजनेतून श्रवणयंत्र मोफत दिले जाणार आहे. प्रसुतीपुर्व तपासणी, कुटुंबनियोजन शस्रक्रिया तसेच प्रसुतीची सुविधा मोफत दिली जाणार आहे. यावेळी रुग्णांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.