Breaking News

कर्जत येथे महावीर जयंती उत्साहात


कर्जत येथे भगवान महावीर स्वामी यांचे जन्म कल्यानकांनिमित्त जैन बांधवानी भव्य मिरवणूक काढली. यानंतर आराधना भवन येथे जन्मवाचन संपन्न झाले. कर्जत येथे सालाबादप्रमाणे भगवान महावीर यांचे जयंतीनिमित्त येथील जैन मंदिरामध्ये सकाळी स्नात्रपूजा झाली. तर 9 वा. जैन स्थानकामध्ये प्रथम मांगलिक घेऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. कर्जत येथील व्यापारी आनंदकुमार छाजेड यांचेहस्ते भगवान महाविरांच्या प्रतिमेस मोती माळा घालण्यात आली. जैन स्थानकासमोरून मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये जैन धर्मीय स्त्री-पुरुष उत्साहाने सहभागी झाले. युवकांनी टिपर्‍याच्या माध्यमातून शिस्तबद्ध मिरवणूक काढून कर्जतकरांचे लक्ष वेधले. मिरवणुकीनंतर आराधना भवन येथे विविध चढावे झाले. येथे जन्म वाचन करण्यात आले. त्यानंतर महावीर ग्रुपच्या वतीने गौतमप्रसादिचे आयोजन करण्यात आले.