Breaking News

कोल्हापूर : महापालिका शाळांतील आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कोल्हापूर, दि. 03, मार्च - महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत पल रूग्णालयामार्फत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. महापौर स्वाती यवलूजे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन मनपा यशवंतराव चव्हाण विद्यालयात करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे प्रमुख उपस्थित होत्या.


विद्यार्थी-विद्यार्थीनींचे आरोग्य चांगले रहावे. आरोग्याबाबत शालेय वयापासूनच मुलांनी जागरुक असावे. त्यामुळे आरोग्य हीच खरी दौलत असल्याचे प्रतिपादन महापौर यवलूजे यांनी केले. त्यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी करुन सर्दी, ताप, खोकला व जंतावरील औषधोपचार करण्यात आले. सभापती वनिता देठे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.