Breaking News

‘कृषी जैवतंत्रज्ञान’मध्ये कौतूक सोहळा उत्साहात


प्रवरानगर प्रतिनिधी - राष्ट्र उभारणीत युवकांची असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यादृष्टीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सांगलीच्या वालचंद कॉलेज अॉफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या 'डिपेक्स' या नामांकित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या प्रत्येक ६ विद्यार्थ्यांच्या दोन गटाने सहभाग नोंदवला होता. यावेळी शुभम खर्डे यांच्या मिल्किंग मशीन' व मैथिली जाधव यांच्या 'युटिलायझेशन अॉफ अनकन्वेन्शनल फीड स्टफ' हे दोन प्रकल्प सादर करण्यात आले होते.