रामकथा स्त्रवन केल्याने जिवनाचे सार्थक होते - आचार्य. शंकरस्वामी महाराज
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित हनुमान जयंती व श्रीराम कथा धर्मध्वजारोहण महंत सुनीलगीरी महाराज यांचे हस्ते झाले. यावेळी श्रीराम कथा प्रवक्ते शंकरस्वामीजी महाराज, गोपालगिरी महाराज, अंकुश महाराज कादे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, अशोक मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे , गणेश गव्हाणे आदि उपस्थित होते. यावेऴी सायंकाळी सात ते नउ या वेळेत रामयाण कथा पार पडली. यावेळी कथेत आचार्य. शंकरस्वामी महाराज म्हणाले की रामकथा ऐकल्यानंतर जीवनाचे सार्थक होते. जो देवाचे भजन करतो त्याचे दु:ख दुर होते. देवाची श्रद्धा करताना त्यामध्ये एकाग्रता पाहिजे , संताचे पुजन, दर्शन, सानिध्यात असेल तर जीवन धन्य आहे असेल मानले जाते,
मनुष्याचा जीवनात ज्ञान आहे पण भक्ती नाही ते ज्ञान व्यर्थ आहे. जीवनात परमार्थ करावा , वडाचे झाड हे शिव मानले जाते तर पिपळाचे झाड नारायण आहे , राम कथेतील प्रसंग जीवनात बोध देणारे आहेत . असा ऐकही मनुष्य नाही कि त्यांच्या जीवनात कधीही आभिमान आला नाही, प्रत्येक ला जीवनात पद, ज्ञान, रूप, प्रतिष्ठा दाखवण्याची इच्छा असते तेथे आभिमान अडवा येतो, पदाचा आभिमान ज्याला आहे त्याच्या कडे कालांतराने पद राहत नाही, नेवासाच्या माऊलींच्या भुमीने जगाला भक्तीचा मार्ग दिला , जगातील सुख दुखासाठी हे शरीर आहे , जगण्याचे सार्थक देवाच्या भजनाने होते, जीवनामध्ये देवाची भक्ती आली का आंनद निर्माण होतो. रामकथा ऐकल्यावर जीवनातील दुख दुर होते तर भक्ती आणि भजन केल्यानंतर जीवनात आंनद मिळतो, राम नाम जप केला पाहिजे , आपले जीवन ज्ञान मय व्हावे , जीवनात हनुमंतरायांची भक्ती केली पाहिजे हनुमंत रायची भक्ती केली तर जीवनात दुख निर्माण होत नाही असे यावेळी महारांजानी पहिल्या पुष्पात सांगितले यावेळी भेंडा , कुकाणा, देवगाव, सोंदाळा परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.