Breaking News

मांडूळाची तस्करी करणार्‍या दोन जणांना अटक


ठाणे,  मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना अटक करण्यात आली. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील अहमद वुलन या बंद पडलेल्या कंपनीसमोर सापळा लावून या तस्करांना अटक केली.

सुरेश निकम आणि संजय पवार असे अटक केलेल्या सर्प तस्कराचे नाव असून त्यांच्याकडून पोलिसांनी 12 लाख रुपये किमतीचे पिवळसर आणि चॉकलेटी रंगाचे 2 दुर्मीळ मांडूळ जप्त केले आहेत. त्याची लांबी साडेतीन फूट आणि एकाची 3 फूट आहे.
 
उल्हासनगर गुन्हे शाखेचे भरत नवले यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 (ड) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या दुर्मीळ सापाला सर्प मित्राकडे सुरक्षितपणे ठेवले आहे.