Breaking News

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस

पुणे : यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने शनिवारी वर्तवला. अल नीनो च्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अल नीनोची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे हवामान खात्याने म्हटले. अल नीनो कधी निर्माण होईल माहित नाही, मात्र ते तसेच सुरु राहिले, तर ते भारतातील मान्सूनसाठी चांगले असेल, असे मत पुणे हवामान विभागाचे व रिष्ठ शास्त्रज्ञ आर. कृष्णन यांनी मांडले आहे. शिवाय, येत्या काही महिन्यात ला नीना कमजोर झाला, तरी मान्सूनवरील प्रभाव सर्वसामान्य असेल. अल नीनो कमजोर झाला, तरी अल नीनो निर्माण होण्यास काही महिन्यांचा कालावधी जाईल, असेही आर. कृष्णन म्हणाले. 2014-15 साली मध्य भारतात फार मोठा दुष्काळ पडला होता. अनेक ठिकाणी पाण्याच रक्षण करण्यासाठी चौकीदारही ठेवण्यात आले.