Breaking News

काँग्रेस कदापी झुकणार नाही : सोनिया गांधी

नवी दिल्ली : देशात गेल्या 4 वर्षांपासून अहंकारी सरकार सत्तेवर आहे. त्यांनी सर्व शक्तिनिशी काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र,काँग्रेस कधीही झुकलेली नाही आणि यापुढे देखील कदापिही झुकणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग चेतविले. पक्षाच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या महाअधिवेशनात त्यांनी क ार्यकर्त्यांना संबोधित केले. काँग्रेस ही केवळ राजकीय संकल्पना नाही. तर ती एक चळवळ आहे. सद्यस्थितीत पक्षाला कसे मजबूत करता येईल याचा कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा, असे सोनिया गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी कठीण काळात जबाबदारी स्वीकारल्याचे सांगत. ही नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे सोनिया गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आपल्याला भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला हवेत अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली. मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकासदर सर्वोच्च होता. मात्र, युपीए सरकारच्या काळात हाती घेतलेल्या योजनांना मोदी सरकारने कमजोर केल्याचा आरोप सो निया गांधींनी केला. पक्ष कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्यासाठी सोनियांनी भाषणादरम्यान चिकमंगळूर निवडणुकीचा उल्लेख केला. 40 वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऐतिहासिक विजय मिळविला होता. याच प्रकारच्या कामगिरीची पक्षाला गरज असल्याची भावना सोनियांनी बोलून दाखविली.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्याला मजबूत आणि सशक्त काँग्रेस पक्ष निर्माण करायचा आहे. केवळ काँग्रेसचे चिन्हच देशाला एकत्र ठेऊन पुढे नेऊ शकते, असे काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय काँग्रेस महाअधिवेशनात बोलत होते. हे काँग्रेसचे 84 वे महाअधिवेशन आहे.


हे एकमेव चिन्ह आहे (काँग्रेस पक्षाचे चिन्ह), जे देशाला एकत्र ठेऊन, पुढे नेऊ शकते. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील होणारे हे पहिलेच महाअधिवेशन आहे. या अधिवेशनात पुढील पाच वर्षांसाठी काँग्रेसची दिशा काय असावी, यावर चर्चा होणार आहे. तसेच काही महत्वपूर्ण प्रस्तावही यावेळी पा रित केले जाणार आहेत. आज देशात द्वेश पसरवला जात आहे, एका व्यक्तीला दुसर्‍याविरुद्ध भडकावले जात आहे. मात्र आमचे काम जोडण्याचे आहे. भाजपवर निशाणा साधताना राहुल यांनी म्हटले आहे, की आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना विसरत नाही. आमच्या पक्षाचे नेते, जसे सोनिया गांधी, मनमोहन सिंग पक्षासाठी झटत असतात. आमचे काम वरिष्ठ नेते आणि युवकांना जोडण्याचे आहे. कांग्रेस पक्ष आपल्या दिग्गज नेत्यांच्या आणि तरुणांच्या बळावर पुढे वाटचाल करेल. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू. मोदी सरकारमध्ये आपल्याला रोजगार केव्हा मिळणार, शेतकर्‍यांना त्यांचे हक्क केव्हा मिळणार ? हेच कळणे अवघड झाले आहे. तसेच या अधिवेशनात भविष्यावर चर्चा होणार असल्याचे गांधी म्हणाले.