Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून शुभेच्छा

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील गुडलक फाउंडेशन संचलीत डि. के.जी. पाटील आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स ज्यनियर कॉलेज, शंभुराजे इंग्लिश मेडियम व सिद्धी कंम्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने भांबोरा येथिल परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यात आल्या. अकरावीत शिकत असणार्‍या विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थिनींचे स्वागत केले. यामध्ये गुलाबपुष्प, पेन चॉकलेट, पाणी बाटली व शुभेच्छा संदेश देण्यात आला. या अभिनव शुभेच्छा उपक्रमाने परीक्षार्थी क्षणभर सुखावून गेले. इंग्रजीचा पेपर असल्याने माझ्या मनात भिती होती परंतु या शुभेच्छांमुळे माझा मनावरील ताण कमी झाला असे या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया किशोरी रणदिवे हिने दिली.डि.के.जी पाटील ज्युनियर कॉलेज दरवर्षी हा अभिनव उपक्रम राबवते. यामधून 10 वीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थांच्या मनामध्ये एकप्रकारची भिती असते, ती भिती व ताण कमी करणे आनंदी वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो असे डी.के.जी.च्या प्राचार्या कविता मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.