बास्केटबॉल खेळाडूंना प्रमाणपत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
ज्या बास्केटबॉल खेळाडूंनी 2015-16, 2016-17 व 2017-18 या वर्षांत विविध वयोगटात राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेत जिल्हा संघांचे प्रतिनिधित्व केले. परंतु, अद्याप प्रमाणपत्र घेतलेले नाही अथवा प्राप्त झालेले नाही, अशा खेळाडूंनी 25 मार्चपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सदस्य सिद्धार्थ लाटकर यांनी केले आहे. संबंधित खेळाडूंनी प्रमाणपत्राची मागणी शाळा, महाविद्यालय, क्रीडा संस्थांच्या माध्यमातून अथवा वैयक्तिक स्वरूपात अर्जाद्वारे करावी, असे लाटकर यांनी कळविले आहे.
