अपघातातील मयत विदयार्थ्याच्या कुटूंबींयास अडीच लाखाची मदत
जळगाव, दि. 03, मार्च - चाळीसगाव येथील मौजे पिलखोड येथील विद्यार्थी किरण सतिलाल माळे (भिल्ल) याचे डोणपिंप्री शिवारात शेतीचे काम करीत असताना अंगावर विज पडून मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती.
त्याचे अपघाती निधन झाल्यामुळे महाविद्यालयाकडून विद्यार्थी सुरक्षा अपघात सहाय्यता योजनेअंतर्गत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या अन्वये विमा कंपनीकडून विम्याची रक्कम दोन लाख पंचविस हजार रूपयांचा धनादेश मयताचे वारसदार म्हणून किरणचे वडील सतीलाल गुलाब भिल्ल यांना महा विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक एम. व्हि.बिलदीकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या योजने अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून कुलगुरू वैद्यकीय सहायता निधीतून विद्यार्थ्याच्या वारसदारास मिळणारे अतिरिक्त आर्थिक सहाय्य रक्कम दहा हजार रूपयांचा धनादेश देखील प्रभारी प्राचार्य प्राध्या.एम. व्हि.बिलदीकर यांच्या हस्ते देण्यात आला.
किरण हा शहरातील महाविदयालयात शिक्षण घेत शेतमजुरीचे काम करून कुटूबांचा उदरनिर्वाह भागवत होता. मोलमजुरी करून शिक्षण घेत असलेल्या किरणला मोठ अधिकारी व्हायचं होत. त्याच्या पश्यात आई, वडील व लहाण भाऊ असा परिवार आहे.