सीडीआर प्रकरणी रजनी पंडित यांची जामीनावर सुटका
ठाणे, दि. 14, मार्च - महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अखेर 38 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. बेकायदेशीररित्या सीडीआर काढल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रजनी पंडित यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
सीडीआर प्रकरणात सोमवारी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस भैसारे यांच्या न्यायालयाने 20 हजाराच्या जामीनावर अटी शर्थीनुसार रजनी पंडित यांची सुटका करण्याचे आदेश दिले. नंतर न्यायालयीन दस्तावेजाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मंगळवारी कारागृहाच्या पेटीत मेमो टाकण्यास उशीर झाल्याने आज सकाळी रजनी पंडित यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.