‘टॅलेंट सर्च’ परिक्षेत ५०० विद्यार्थांचा सहभाग
राहाता प्रतिनिधी :- कोहाळे येथील श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या ‘टॅलेंट सर्च’ परिक्षेत ५०० विद्यार्थांनी सहभाग घेतला. गणेश स्कूलमध्ये दि. २५ मार्च रोजी नुकतीच १० वी बोर्ड परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे प्रा. विजय शेटे यांनी ‘टॅलेंट सर्च’ परिक्षा घेण्याचा उपक्रम राबविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी याचा फायदा व्हावा, यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
या उपक्रमामुळे १२ वी नंतर विद्यार्थ्यांना बुध्दीमत्तेप्रेमाणे विविध विषयाच्या स्पर्धा परिक्षा देण्यासाठी कुठलीही प्रकारची भिती वाटत नाही. त्यांचा सराव टॅलेंट सर्च परिकक्षेच्या माध्यमातून करून घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होतो, असे प्रा. विजय शेटे यांनी सांगितले. या परिक्षेमध्ये चिंधे यश शिवाजी कोळस्कर आदर्श महेश यांना प्रथम क्रमांक मिळाला. यावेळी विद्यालयाचे राहूल वलटे, प्रा. रियाज शेख, रामनाथ पाचोरे, भरत शेटे, संदिप चौधरी, प्रविण दहे, प्रशांत पडघलमल, महेश कुरकुटे, यांचेसह पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.