मोहोळ क्रीडा संकुलाचा 14 वर्षांचा प्रश्न सुटला
सोलापूर, दि. 03, मार्च - तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत नागनाथ मंदिर परिसरातील देवस्थानची आणि नगरपरिषदेची अशी एकूण अडीच एकर जागा संकुलासाठी नि श्चित करण्यात आली. जागेचा अभाव व राजकीय अनास्था यामुळे 14 वर्षांपासून क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रलंबित होता. या निर्णयामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत अधिकार्यांनी नागनाथ देवस्थान परिसर आणि नगरपरिषदेच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ती जागा निश्चित करण्यात आली. या संकुलात 200 आणि 400 मीटरचे धावमार्ग, बॅडमिंटन हॉल, व्यायामशाळा, ड्रेसिंग रूम आदी विविध सुविधा करण्यात येणार आहेत. जुन्या नियमाप्रमाणे एक कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. अंदाजे दोन ते तीन कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करू, असे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले.