Breaking News

उल्हासनगर : टिल्सन लॉजवर पोलिसांचा छापा ; 10 महिलांची सुटका

ठाणे,  उल्हासनगरमधील टिल्सन लॉजवर पोलिसांनी छापा टाकून 10 महिलांची सुटका केली. या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. 10 महिलांना खोलीमध्ये ठेऊन, त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून लॉज चालक व वेटर वेश्या व्यवसाय करून घेत होते. अखेर पोलिसांनी त्या ठिकाणाहून 10 महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी 8 ग्राहक व लॉज चालक किशोर साव, वेटर विजय यादव यांना ताब्यात घेतले आहे.