Breaking News

सुकमा येथे 59 नक्षलवाद्यांनी केले समर्पण

सुकमा : छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यातील 59 नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रे टाकून समर्पण केले. यामध्ये 16 स्त्रियांचा समावेश आहे.

बस्तर येथील महानिरीक्षक विवेकानंद, पोलीस अधीक्षक अभिषेक मीना व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट पंकज कुमार यांच्या उपस्थिती नक्षलवाद्यांनी गुरूवारी एर्राबोर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्रांसह समर्पण केले. यामध्ये गगनपल्ली, मनीकोंटा, डब्बाकोंटा, मरईगुडा व बिरला या गावांमधील नक्षलवाद्यांचा समावेश आहे. विकासाच्या व आदिवासी विचारधारेच्या विरोधी असलेल्या नक्षलवादाच्या हिंसक विचारधारेला कंटाळून या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे.