Breaking News

डीएसकेंविरोधात 180 गुंतवणुकदारांची तक्रार


पुणे : डीएसके दाम्पत्याविरोधात 180 गुंतवणुकदारांनी तक्रारी दिल्या असून त्यांच्याविरोधात आतापर्यंत 5 हजार 138 तक्रारी आल्या असून फसवणुकीचा आकडा 367 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी दिली. कुलकर्णी दाम्पत्याला अटक केल्यानंतर गुंतवणुकदारांच्या तक्रारी घेणे पोलिसांनी थांबवले होते. 5 मार्चपासून तक्रारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर 180 गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या आहेत. कुलकर्णी यांच्या एकूण 69 कंपन्या आहेत. त्यांच्या गोठवलेल्या 276 बँक खात्यात फक्त 11 कोटी रुपये आढळल्याचेही मोरे यांनी सांगितले.