Breaking News

जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत सापडल्या बनावट नोटा

मुंबई, दि. 01, मार्च - सिडको परिसरात बेकायदेशीर चालणार्‍या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.या नोटा जुगार खेळणार्‍या 3 आरोपींकडे सापडल्या आहेत.

यावेळी पोलिसांनी रोख रकमेसह मुद्देमाल आणि तीन जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेली रकम मोजत असतांना त्या सगळ्या नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांचे मुल्य दीड लाख एवढे होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अफसर खान हा असून त्याच्याकडेच या सगळ्या नोटा आढळून आल्या आहेत.