नागपूर : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुन्हा एका सरकारी कर्मचार्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूरमध्ये ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेतले. नागपूर महापालिकेत काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तीने नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपूर महापालिकेतून अनुशासनात्मक कारवाई करुन नोकरीवरुन काढून टाकलेल्या सात जणांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. आपल्याला नोकरीत पुन्हा घ्यावे, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला होता. मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू रविवारी सकाळी हे सात जण एका गाडीने सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पोहचले. त्यापैकी एकाने अचानक अंगावर रॉकेल ओतून घेतले, मात्र पोलिसांनी वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. सुदैवाने आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती सुखरुप आहे. त्याच्यासोबत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. रामगिरी परिसरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:39
Rating: 5