Breaking News

स्वखर्चातुन धोंडिराज महाराज मठाचे सुशोभीकरण

कुळधरण / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील धोंडीराज महाराज मठाचे सुशोभीकरण काम प्रगतिपथावर आहे. बबन लहाडे यांनी स्वखर्चातुन मंदिरासमोर शेड, परिसरातील जागेचे सपाटीकरण, वृक्षारोपण आदी कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे मठ परिसराची शोभा वाढली असुन भाविकांची सोय होत आहे.कुळधरणच्या पश्‍चिमेला धोंडीराज महाराज मठ असुन येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. 


मंदिरासमोर शेड बांधकाम करण्यात आल्याने भाविकांची सोय झाली आहे. मंदिरासमोरील जीर्ण वडाचे झाड हटवून जागेचे सपाटीकरण काम सुरु आहे. मंदिराच्या भोवती वृक्षारोपण करण्यात आले आहे. सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे परिसर आकर्षक व सुशोभित बनला आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. नजीकच्या दत्तमंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. गावाजवळील हे धार्मिक स्थळ असल्याने येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले जाते अशी माहिती बंडु लहाडे यांनी दिली.

हायमॅक्सने परिसर प्रकाशमय
जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या निधीतून मठासमोर हायमॅक्स दिवा बसविण्यात आलेला आहे. त्यामुळे हा परिसर प्रकाशमय बनला आहे. पंचायत समिती सदस्या साधना कदम यांच्या निधीतून आणखी एका दिव्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती सुधीर जगताप यांनी दिली.