Breaking News

व्यावसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली ः जिल्हाध्यक्ष काशीद

जामखेड / ता. प्रतिनिधी :- तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत मुलांना संगणक प्रोजेक्ट वाटप केल्याने व्यावसाया बरोबरच एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रमेश आजबे यांनी केले असल्यााचेे मत सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी व्यक्त केले आहे. 

सावळेश्‍वर ट्रॅक्टर्सच्या वतीने शहरातील नगररोड येथे शेतकर्‍यांसाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जॉन डिअर कंबाईन हार्वेस्टर चे तीन राज्याचे आनंद कसबे, महाराष्ट्र सेलचे अधिकारी भास्कर सांगळे, टेरीटेअर मॅनेजर रामदास उकले सावळेश्‍वर ट्रॅक्टर्सचे रमेश आजबे, माजी कृषी अधिकारी घनश्याम डुचे, अंगद सांगळे, नान्नजचे मा. सरपंच महेंद्र मोहळकर, दादासाहेब ढवळे, विष्णू काळदातेसह जॉन डीअरचे पदाधिकारी, शेतकरीग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.