श्रीदेवीचे पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द
मुंबई : श्रीदेवी यांच्या मृत्यूला 48 तास उलटल्यानंतर विविध तर्क वितर्कांना उधाण आले असून, श्रीदेवी यांचा मृत्यूप्रकरणी संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. दुबईच्या सरकारी वकिलांकडून सखोल चौकशीनंतर श्रीदेवींचे पार्थिव मंगळवारी दुपारी त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात मंगळवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुबई पोलिसांनी अधिकृतपणे केस बंद केली असून, श्रीदेवी प्रकरणात दुबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली. श्रीदेवीचे पार्थिव नेण्यासाठी कपूर परिवाराला दुबई पोलिसांकडून परवानगी मिळाली. तसेच कपूर परिवाराला प्रमाणपत्र दिले.
भारतीय दुतावासालाही प्रमाणपत्र दिले. श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या 48 तासानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत अनेक वेगवेगळया प्रश्नांमुळे हा मृत्यू की हत्या यावर प्रसारमाध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या. पोलिसांकडून बोनी कपूर यांची चौकशी करण्यात आली पण शंकेचे निरासन न झाल्यामुळे त्यांना अद्यापही क्लीन चीट देण्यात आली नाही आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्या हा ॅटेलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आणि श्रीदेवी यांच्या प्रत्येक नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येणार आहे. श्रीदेवी जर 2-3 दिवस रूममधून बाहेर आल्या नाहीत तर त्यांना सोडून तुम्ही भारतात का पळालात असा सवाल दुबई सरकारने बोनी यांना विचारला आहे. त्यामुळे या तपासात अजून काय समोर येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. या प्रकरणाची चौकशी कालच दुबई पोलिसांकडून सरकारी वकील कार्यालयाकडे सोपवण्यात आली आहे. पार्थिवाला रासायनिक लेप लावणे, त्यांचा पासपोर्ट रद्द करून श्वेत रंगाचा पासपोर्ट देणे, बोनी कपूर यांचा जबाब नोंदवणे आणि सरकारी वकिलांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे, कायदेशीर प्रक्रियेतले हे टप्पे अजून बाकी आहेत.