Breaking News

स्वित्झर्लंडच्या उपराष्ट्रपतींनी केला आ. थोरातांचा सन्मान महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची स्विस पार्लमेंटला भेट

संगमनेर प्रतिनिधी ;- राज्याचे अभ्यासू नेते, माजीमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाने नुकतीच स्विस पार्लमेंटला भेट दिली. यावेळी स्वित्झर्लंडचे व्हाईस प्रेसिडेंट ऊलीमाऊरर यांनी आ. थोरात यांचा सन्मान केला.


आ. थोरातांच्या नेतृत्वाखाली स्विझलॅन्ड देशाची राजधानी बर्न येथे अभ्यास दौर्यासाठी गेलेल्या दहा आमदारांच्या शिष्टमंडळाने स्विस पार्लमेंटला भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी स्वित्झर्लंडचे व्हाईस प्रेसिडेंट ऊलीमाऊरर व तेथील खासदार उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी स्वीस पार्लमेंटच्या कामकाजाची मा हिती दिली.
या दौर्यात महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सदस्यांनी इंग्लंड, पॅरिस, स्वित्झर्लंड येथील संसदीय लोकशाही प्रणालीचा अभ्यास केला. तेथील कामकाज, सदस्यांचे प्रश्‍न मांडणीच्या पध्दती, त्यांचे निवारण, कार्यवाही, लोकशाही अधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य अशा वेगवेगळ्याा विषयांचा अभ्यास केला. प्रगती, शिस्त व स्वच्छता असलेल्या या देशाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. या देशाने महाराष्ट्रात गुंतवणुकीसासाठी यावे, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली आहे.