Breaking News

आ. कोल्हे यांनी फुलविले ‘त्यांच्या’ चेहऱ्यावर हास्य! गोर-गरीबांच्या संसारास गॅसचा हातभार


कोेपरगांव : शहर प्रतिनिधी ;- महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यात हातखंडा असलेल्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी उज्वला योजनेपासून वंचित असलेल्या ४० गोर-गरीब आदिवासी मागासवर्गीय महिलांच्या संसारास हातभार लावला आहे. संजीवनी महिला बचतगट बहुउददेशीय सेवा संस्थेच्यावतीने ४० गॅस कनेक्शनचे नुकतेच वितरण करण्यात आले. गॅस मिळताच या महिलांच्या चेह-यावर हसू फुलले.

गरीब आदिवासी मागसवर्गीय दारिद्रयरेषेखालील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजनेअंतर्गत गॅस वितरित केले आहेत. यासाठी मतदार संघातील ४० वंचित महिलांची नावे शोधुन त्यांना आ. कोल्हे यांनी संजीवनी बहुउदद्देशीय संस्थेच्यावतीने गॅस कनेक्षनचे वाटप केले. 

याप्रसंगी बोलतांना आ. कोल्हे म्हणाल्या, की शासनाच्या अनंत योजना आहेत. त्या मतदारसंघातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यांसाठी आपण अहोरात्र परिश्रम घेत असतो. महिला बचतगट हा आपला आत्मा आहे. त्या माध्यमातून सुरू केलेले काम आपणांस नेहमीच प्रेरणा देते. या महिलांच्या संसारात छोटासा हातभार लागावा, या उद्देशाने ४० गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कोपरगांव गॅस कंपनीचे सहायक कर्मचारी निमसे यांनी महिलांना गॅस हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, धनेश्वरी कोल्हे आदींसह विविध महिला बचतगटांच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव मोठया संख्येने उपस्थित होते. सतिश लोहकणे यांनी आभार मानले.