Breaking News

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जनच्या पूर्वतयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी


मुंबई - बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे रविवारी होणार्‍या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन -2018 च्या पूर्व तयारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हीआयपी कॉन्फरन्स रूम, बैठक व्यवस्था, स्टेज, सुरक्षा याबाबतची माहिती वरिष्ठ अधिका-यां कडून घेऊन सूचना केल्या. शिवाय मुख्यमंत्र्यांनी विविध उद्योगांच्या स्टॉलला भेटी देऊन तयारीबाबत माहिती घेतली. याठिकाणी माध्यमांसाठी मीडिया सेंटरची सोय करण्यात आली आहे.