Breaking News

श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाला धर्मध्वजारोहनाने प्रारंभ


जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या पवित्र भूमीचे वर्णन भूलोकीचा स्वर्ग व आत्मिक शांतीचे केंद्र असल्याचे सांगून या देवस्थानच्या उत्कर्षासाठी आमचे देखील पाठबळ कायम राहील अशी ग्वाही दिली.यावेळी हभप. बद्रीनाथ महाराज तनपुरे बोलताना म्हणाले, त्रिवेणीश्वर देवस्थान क्षेत्राचे महंत सुनीलगिरी महाराजांनी उजाड माळरानावर नंदनवन केले. असल्याचे गौरवोदगार काढले. याप्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत नामदेवगिरी महाराज, एलोरा महंत भूपेंद्रगिरी महाराज यांनी सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी भाविकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमास हभप. माणिक महाराज आदमने, शेतकरी नेते पी.आर.जाधव, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, किशोर जोजार, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, दिलीपराव सरोदे, हभप के.एम.बाबा फाटके, जनार्धन जाधव, काशिनाथ नवले, रावसाहेब घुमरे, शिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, दिनकर गर्जे, दीपक अकोलकर, बापूराव बहिरट, बाळासाहेब देवखिळे, दत्तात्रय घोलप, जनार्दन पटारे, मनोहर जाधव, राजेंद्र उंदरे, डॉ.सचिन सांगळे, भिवाजी आघाव, येवला येथील विठ्ठलराव शेलार यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित भक्त परिवाराचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आभार मानले. 

संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाब प्रांतापर्यंत नेली त्यांच्या याच भूमीत मला शिवकथा सांगण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्याचे गौरवोदगार पंजाब येथील शिवकथाकार महंत भूपेंद्रगिरी महाराज यांनी काढले. संत व देवात भेद करू नका ते एकच रूप असल्याचे त्यांनी सांगितले.