Breaking News

रत्नागिरीत ग्रंथालयविषयक राज्यस्तरीय कार्यशाळा

रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि भारत सरकारच्या कोलकाता येथील राजाराममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात ही कार्यशाळा होईल.


गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेला तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथपाल डॉ. सुनीता बर्वे, गोखले इन्स्टिट्यूटचे ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे, मुंबईच्या बेडेकर कॉलेजचे ग्रंथपाल संजय सकपाळ मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या वीस वर्षांत ग्रंथालयातील आधुनिकीकरणाचे बदल झपाट्याने झाले. त्यात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली. खासगी सॉफ्टवेअर्स विक्रेत्यांनी हरतर्हेणची सा ॅफ्टवेअर्स काढली. परंतु त्यात एकसूत्रीपणाचा अभाव होता. नव्या सुधारित आवृत्तीची नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन:पुन्हा खर्च करावे लागले. या खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या व अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक आशेने बघू लागले. या कार्यशाळेच्या निमित्ताने याची सर्व उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे. कार्यशाळेच्या निमित्ताने राज्यातील आणि विशेषतः कोकण विभागातील ग्रंथपालांना कोहा आणि डीस्पेस ओपन सोर्स संगणक प्रणाली शिकण्याची उत्तम संधी प्रथमच उपलब्ध होत आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल, कर्मचारी आणि ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी या क ार्यशाळेकरिता आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.