Breaking News

महालखेडा येथे वडिलांसह दोन मुले एक्सप्रेस कालव्यात बुडाली

येवला, दि. 20, फेब्रुवारी - तालुक्यातील एक्सप्रेस कालव्यात वडिलांसह दोन्ही अल्पवयीन मुले वाहून गेल्याची दुर्दैवी घटना महालखेडे येथे सायंकाळच्या सुमारास घडली.सोमनाथ गीते असे वडिलांचे नाव असून त्यांच्या कार्तिक गीते व सत्यम गीते अशी मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले शालेय शिक्षण घेत होती. यातील कार्तिक हा आठवीत तर सत्यम नववीत शिकतो.


कालव्यातून पाणी घेत असताना प्रथम एका मुलाचा एकाचा तोल गेला. त्याला वाचविण्यासाठी वडील आणि दुसर्‍या मुलानेदेखील कालव्यात उडी घेतली. यातील दोघानाही पोहोता येत नसल्यामुळे तिघेही पाण्यात वाहून गेले. दरम्यान, शोधाशोध सुरु आहे. कालव्यातील पाणी बंद करण्यात आले असून अद्याप कुणाचाही शोध लागलेला नाही.