Breaking News

केशवराव मुर्तंडक सह्याद्री वाहिनीवर


संगमनेर प्रतिनिधी ;- माजीमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांचे विश्‍वासू सहकारी, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आणि प्रगतशील शेतकरी केशवराव मूर्तडक यांची ‘डाळिंब शेती’ या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सोमवारी {दि. २० } सायंकाळी सव्वा सात वाजता मुलाखत होणार आहे. मूर्तडक यांनी लोहारे-कसारे या दुष्काळी भागात ८ एकरावर डाळिंब शेती फुलवली आहे. सह्याद्री वाहिनीच्या ‘गुरुकिल्ली समृध्दीची’ या कार्यक्रमामध्ये विशेष सदरात त्यांची मुलाखत घेतली आहे. मूर्तडक यांची शेती पध्दत इतर शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.