Breaking News

जिल्हास्तरीय जलनायकांच्या नियुक्त्या जाहीर,सुखदेव फुलारी यांचा समावेश


भेंडा /प्रतिनिधी /- जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीने 10 व्यक्तींची जिल्हास्तरीय जलनायक (जलप्रेमी) नियुक्ती जाहीर केली. त्यात भेंडा येथील रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियानाचे प्रवक्ते व पत्रकार सुखदेव फुलारी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दि.30 नोव्हेंबर 2016 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार यशदा येथे राज्य शासनाचे जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामार्फत ग्रामपंचायत स्तरापासून राज्यस्तरापर्यंत जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी नगर जिल्ह्याकरिता 10 जिल्हास्तर जलनायक (जलप्रेमी), 12 तालुकास्तर जलनायक(जलदूत) आणि प्रति जिल्हा 50 ते 60 जलकर्मी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीने नियुक्त केलेले जिल्हास्तरीय जलनायक-जलप्रेमी असे आहे.