Breaking News

नोकरीच्या अमिषाने 80 हजाराचा गंडा


पुणे : विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्याचे अमिष दाखवून 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात उमेश गंगाराम पुजारी (रा. टिंगरेनगर) याच्यावर येरवडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत येरवडा भागात राहणार्‍या 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत घडली. फिर्यादी यांच्या पतीला विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्याचे अमिष पुजारी याने दाखविले. त्यांच्याकडून 80 हजार रुपये, रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला आणि गुणपत्रक घेतले. त्यानंतर नोकरी तर लावलीच नाही. याऊलट घेतलेले पैसे, मूळ कागदपत्र परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.