Breaking News

महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज – डॉ. प्रभाकर देसाई


राहुरी प्रतिनिधी :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची एक दिवसीय उदबोधन कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, वित्त व लेखा विभागाच्या अधिकारी डॉ. विद्या गारगोटे, मा. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, प्रा.आर.जी. कोल्हे, उपप्राचार्य सूर्यकांत गडकरी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिरुद्ध जाधव उपस्थित पार पडले होते
उदघाटन प्रसंगी डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यार्थी विकास अधिकाऱ्यानी अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याची नितांत गरज आहे विद्यार्थी केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी विद्यापीठ स्तरावर नवीन योजनांची आखणी सुरु आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे आपल्या अध्यक्षीय भाषणात असे म्हणाले की विद्यापीठाने राबविलेल्या विविध योजना महाविद्यालयांनी प्रभावीपणे राबविल्यास त्याचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना होईल विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी या योजनांचा प्रभावीपणे वापर होणे गरजेचे आहे. 

डॉ. विद्या गारगोटे यांनी कार्यशाळेस शुभेच्या संदेश देताना म्हणाल्या की, वित्त व लेखा परीक्षणामध्ये अमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले असून त्या बदलला अनुरूप विद्यापीठाने धोरण तयार केले आहे वित्त व लेखा विभाग विद्यार्थी विकास योजनांसाठी प्रयत्नशील आहे या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शंभर विद्यार्थी विकास अधिकारी उपस्थित होते तसेच विद्यापीठातून तांत्रिक सल्लागार म्हणून श्री. मनोज परदेशी, ललित बोरसे यांनी तांत्रिक माहिती देवून विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसण केले 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिरुद्ध जाधव यांनी केले. उपप्राचार्य सूर्यकांत गडकरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन डॉ. संदीप इरोळे व प्रा. दत्तात्रय खिलारी तर आभार प्रा. प्रतिक्षा देशमुख यांनी मानले. 

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. उदयसिंह पाटील उपाध्यक्ष श्री. शामराव निमसे कार्यकारी संचालक बी.एन. सरोदेसाहेब व डॉ. बी.बी. तनपुरे सह.साखर कारखाण्याचे सर्व संचालक यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभले.