राजमाता माँ जिजाऊं जयंतीनिमित्त आगळेवेगळे अभियान
धम्मदिप युवा मंचच्यावतीने विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनीही हा उपक्रम राबविण्यात आला होता. पुरोगामी महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार रुजवून सध्या जे कलुषीत व दूषीत जातीय व धर्माचे वातावरण दिसून आले, त्यास या उपक्रमातून उत्तर मिळत आहे. सामाजिक सलोखा, सामाजिक बहुद्देशीय उपक्रम हाती घेवून महामानवांची विचारधारा राबवण्याचे कार्य ख-या अर्थाने राहुरीचा धम्मदिप युवा मंच करत आहे, असे प्रतिपादन शिरीषराव गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले.
राहुरी येथील कन्या विद्या प्रशालेत संयुक्त जयंती कार्यक्रम अध्यक्षस्थानी एम. जी. साळवे होते. माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, विरोधी पक्षनेते शिवाजीराव तथा दादा सोनवणे, नगरसेवक अक्षय तनपुरे, शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापिका पुष्पा थोरात, नगरपरिषद बचतगट समुहसंघटक सुनंदा दहातोंडे आदींची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कन्या विद्या प्रशालेतील स्वाती कावरे, कावेरी झिंजाडे, हेमलता हराळ, सुरेंद्र गोरे, राजेंद्र लांडे, रावजी भोजने आदींसह शिक्षकवृंद,विद्यार्थी आदी उपस्थित होते. वही पेन संकल्प अभियान यशस्वीतेसाठी धम्मदिप युवा मंच, जयभिम मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, सम्राट ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
