सिनापुत्र मा. आबासाहेब निंबाळकर वि. का. सेवा सहकारी संस्था. मर्या. दिघी या नावाने झाले नामांतर .
कर्जत /प्रतिनिधी/- तालुक्यातील दिघी वी. का. सेवा सोसायटीच्या नामांतरास सहा. निंबधक यांनी परवानगी दिल्याने आता हि सोसायटी सिनापुत्र मा. आबासाहेब निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. दिघी या नावाने ओळखली जाणार आहे.
दिघी येथील दिघी वी. का. सेवा सोसायटीच्या दि २७ सप्टे १७ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक औदुबर निंबाळकर यांनी आपले भूषण असलेले सिनापुत्र आबासाहेब निंबाळकर याचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास चेअरमन अशोक निंबाळकर, व्हा. चेअरमन बापू महानवर, संचालक मंडळ व सभासदांनी आपल्या संस्थेच्या नावात बदल करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार कर्जत येथील सहा. निबंधक याचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावर सहा. निबंधक डॉ अंजली वाघमारे यांनी नावात बदल करण्यास परवानगी दिली असून यापुढे सदरची संस्था सिनापुत्र मा. आबासाहेब निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. दिघी या नावाने ओळखली जाणार आहे.