Breaking News

आंबा बागायतदारांसाठी आज रत्नागिरीत मार्गदर्शन

रत्नागिरी,  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा उत्पादक शेतकर्‍यांसाठी कृषी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन उद्या ( 10 जानेवारी) करण्यात आले आहे.मुंबईतील अलाना कंपनी आणि रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे हा वर्ग होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी 3 या वेळेत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वर्ग होणार आहे.


प्रशिक्षण वर्गामध्ये आंब्याला मोहोर वाढीकरिता, आंब्याची लागवड, आंब्याच्या झाडामध्ये होणारा बदल, आंबा मोहोर संरक्षण, जुन्या झाडांचे सशक्तीकरण (कायाकल्प), फ्रूट सेटिंग, आंब्याच्या झाडावर होणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव व त्यावर उपाय योजना अशा विविध विषयांवर बंगलोर येथील कृषीतज्ज्ञ रमेश आनंद रमियाँ आणि मंजूनाथ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांचे शंकासमाधान करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी व सचिव किरण महाजन यांनी केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन अलाना कंपनीचे व्यवस्थापक फैजअली फडनाईक यांनी केले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य आहे.