Breaking News

जी.एस.टी मुळे छोट्या उदयोग धंद्याचे स्वातंत्र्य धोक्यात –डॉ. भालचंद्र कानगो

जी.एस.टी मुळे छोट्या उदयोग धंद्याचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी प्रवरा ग्रामीण संस्थेच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने “वस्तू व सेवा कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम” या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अ‍ॅड. अप्पासाहेब दिघे होते. 

यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्रवरा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा संभाजी देवकर, बाबासाहेब दळे, सुरेश पानसरे, प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज, उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ व उपस्थित होते. डॉ. कानगो म्हणाले देशामधील विदेशी गुंतवणूक महत्वाची आहे, पण शेतीतील गुंतवणूक कमी झालेली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेतीला झालेलेला आहे. जी.एस.टी चा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, भारतीय शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे हे विचारात घेतले पाहिजे, फॉर्मल इकॉनॉमी तयार होत आहे. जो शेतकरी पूर्वी बियाण घरीच तयार करीत होता त्याने घरी शेतकरी बियाणं तयार करण्याचे बंद केले आहे, इंफॉर्मल इकॉनॉमिला मागे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. फॉर्मल इकॉनॉमी जिकली आहे, नोट बंदीच फटका सर्व सामान्य लोकाना झालेला आहे. जे लोक छोटे छोटे उद्योग करून आपला निर्वाह करत होते त्यांना नोट बंदीचा फटका बसलेला आहे. भारतातील सर्वच घटकावर जी.एस.टी चा परिणाम झालेला आहे. देशभर एकच कर प्रणाली असावी हा हेतु चांगला आहे पण त्याची फलश्रुती निरुतरीत आहे. 

फॉर्मल इकॉनॉमी चे महत्व वाढणं म्हणजे प्रगती आहे का? कार्पोरेट जगाला सर्व बँका ताब्यात घ्यायच्या आहेत. बँका अडचणीत येतील. फॉर्मल धंदा वाढला आहे. बदललेल्या अर्थव्यवस्थेत जी.एस.टी ला महत्व असले तरी विना रोजगार विकास, आणि शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. जी.एस.टी चा अभ्यास एकांगी न करता सर्वांगीण होणे गरजेचे आहे, सर्वसामान्य जनतेवर त्याचा किती परिणाम होईल याचा अभ्यास चर्चासत्रात अपेक्षित आहे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.कराचा फायदा होईल हे चित्र दाखवलं जातय, जी.एस.टी चे प्रत्यक्ष 
परिणाम येत्या अर्थसंकल्पात दिसेल असे कानगो म्हणाले. 

भारताइतका कर कोणत्याच देशात नाही. सिगरेट आणि दारू, प्रत्येक राज्याला चरण्यासाठी कुरण आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीतून सरकारला फायदा झाला आहे. कराचा फायदा हा बेरोजगारीसाठी आणि शेती क्षेत्रासाठी होणे गरजेचे आहे. अ‍ॅड. अप्पासाहेब दिघे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रस्ताविक डॉ. एस. आर. वाळूंज यांनी केले. डॉ. जी. आर. देशमुख यांनी चर्चासत्राची भूमिका मांडली. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे व प्रा. पी. बी. विखे यांनी केले. डॉ. व्ही. ए. खर्डे यांनी आभार मानले.