प्रेस क्लब अध्यक्ष मन्सूर शेख यांनी स्विकारली तोफखाना पो.स्टे. ठाणे अमलदार पदाची सुत्रे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस दलाच्या स्थापना दिना निमित्त (रेझिंग डे) प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांना गुरुवारी संध्याकाळी तोफखाना पोलिस स्टेशनच्या ठाणे अमलदार पदाची सुत्रे देण्यात आली. पो.नि. सुरेश सपकाळे यांनी काही वेळेसाठी शेख यांच्याकडे ठाणे अमलदार पदाची सुत्रे दिली.
पदाची सुत्रे स्विकारताच एका महिलेने पती दारु पिऊन मारहाण करत असल्याची तर एका युवकाने तीन ते चार जणांनी धमकावून मारहाण केल्याची तक्रार केली. ठाणे अमलदार शेख यांनी पो.नि. सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रारदारांची एन.सी. दाखल करुन, सदर प्रकरणाची चौकशी करुन पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.
पोलिस दलाच्या स्थापना दिना निमित्त जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून पोलिस व जनता यामधील नाते वृध्दींगत होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार, डॉक्टर व आदिवासी युवकांना ठाणे अमलदाराचे पदभार देवून, पोलिस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली जात आहे. चोवीस तास व्यस्त असलेल्या ठाणे अमलदार पदाचे तासभर शेख यांनी कामकाज पाहिले.

यावेळी पो.नि. सुरेश सपकाळे यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट करुन, पोलिस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली. पोलिस दलाच्या स्थापना दिना निमित्त प्रेस क्लबच्या वतीने शुभेच्छा देताना महेश महाराज देशपांडे यांनी पोलिसांच्या कामकाजातून जिल्ह्यातील नागरिकांना सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिस दलाच्या ब्रिदवाक्याचा प्रत्यय येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्तछायाचित्रकार यांचा पोलिस दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.