नवी दिल्ली : मुंबई विमानतळावरील वाहतूकमोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नवी मुंबई येथील विमानतळाचे कार्य लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय उड्डयन मंत्री अशोक गजपथी राजू यांनी दिली. लोकसभेत खा. अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुंबई हे देशातील प्रमुख शहर असल्याने येथील विमानतळाचा विस्तार करणे शक्य नाही. यामुळे नवी मुंबईत आणखीन एक नवीन विमानतळ उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार असून या विमानतळाच्या कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
नवी मुंबई विमानतळ लवकरच पूर्णत्वास.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:45
Rating: 5