Breaking News

मद्य परवान्याला ना-हरकत न देण्याची मागणी


नेवासा/प्रतिनिधी/- नेवासा फाटा व परिसरातील देशी-विदेशी मद्य परवाना बिअरबार चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपञ देवू नये.अश्या मागणीचे लेख निवेदन येथील युवकांनी मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी निकम यांना गुरुवारी, ११जानेवारीला दुपारी देण्यात आले. या निवेदनावर सुमारे एक्कावन्न युवकांच्या सह्या आहेत.

मुकिंदपूर व नेवासा फाटा परिसरातील बिअरबार तसेच देशी-विदेशी मद्य परवाना मिळण्यासाठी ग्रामपंतायतीने ना-हरकत प्रमाणपञ न देण्याच्या मागणीचे निवेदन दिले . निवेदना वरती अमोल साळवे, नुर महंमद पठाण, अंबादास इरले यांच्यासह सुमारे एक्कावन्न युवकांच्या सह्या आहेत.