Breaking News

पारनेरात मराठी मुलींची शाळा भरते मंगल कार्यालयात. गोर गरिबांच्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात.


पारनेर/प्रतिनिधी /- शहरातील जुनी मराठी मुलींची शाळेची अवस्था दयनीय झाल्याने जिल्हा परिषदच्या मराठी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाच्या शिक्षणाची पर्यायी शिक्षण प्रशासनाने बाजार तळावर असलेल्या मंगल कार्यालयात केलेली आहे.मराठी मुलीच्या शाळेत पारनेर परिसरातील गोरगरीब, मोलमजुरी व सर्वसामान्य मुले भविष्यात आई-वडीलांचे नाव कमावण्यासाठी धडपडत आहेत. पण या मुलींना या पर्यायी जागेत शैक्षणिक वातावरण नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे असे दिसुन येते.
या संदर्भात हाती आलेले सविस्तर वृत्त असे की , पारनेर शहरात जिल्हा परिषदेची मुले व मुलीची शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतीमघ्ये मुले शिक्षण घेत आहेत. मराठी मुलींची शाळेची इमारत जुनी असल्याने जीर्ण अवस्थे़त असल्याने कधीही पडण्याच्या बेतात आहे. पावसाळ्यात या इमारतीला धोका निर्माण झाल्याने या गोर-गरिबांच्या मुलींची शिक्षणाची सोय शिक्षण विभागाने पर्यायी व्यवस्था म्हणुन शहरातील बाजारतळावर नगरपंचायत कडुन उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे 70 मुली शिक्षण घेत आहेत. यातील एक वर्ग एका राजकिय पुढा-याच्या पतसंस्थेच्या सभागृहात भरवण्यात येतो. तर बाकीचे तीन वर्ग हे एकञ याच मंगल कार्यालयात भरवण्यात येतात. या मंगल कार्यालयात मुलीच्या ञानात भर पडेल यासाठी आवश्यक असणा-या सुविधा अजिबात नाहीत. वर्गात ना नकाशे आहेत , ना दिशादर्शक नावे, ना महापुरुषांचे ओळख असे फोटो,तसेच जनरल नॉलेज साठी काही एक नाही. अनेक समस्याग्रस्त या परिस्थितीत गोर गरिब ,मोलमजुर,सर्वसामान्य मुलींना शिक्षण घ्यावे लागत आहे.

बाजारतळ परिसरात अनोळखी व्यक्तींचा वावर असल्याने या लहानग्या जिविताला धोका निर्माण होउ शकतो. बाजारतळावर मद्यपि , मटकाकिंग, पत्तेवाले, अंमली पदाथँ सेवन करणारे असल्याने यांचा भविष्यात आदर्श घ्यायचा का ? हा प्रश्न सवँ सामान्यांना पडत आहे. शाळेच्या मुख्यध्यापिका एम.एस.नवले म्हणाल्या की, या अडचणीत मुलींना शिकवण्याचे काम करावे लागते.मंगल कार्यालयात आवाज घुमत असल्याने कोण काय बोलतय अजिबात कळत नाही. शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. पण विभागाच्या चालढकल मुळे गोरगरिबाला वंचित रहावे लागत आहे.

पारनेर शहरात महिलांसाठी 10 लाख खर्च करुन व्यायाम शाळा बनविण्यात आली आहे. पण गाेरगरिबांच्या मुलीच्या भवितव्यासाठी राजकिय उदासिनता दिसुन येत आहे. एखाद्या दानशुरांनी या शहरातील खाजगी इमारत वापरण्यास दिली. तर या गोर गरिबांची ससेहोलपट थांबणार आहे. शहराचा दिंडोरा पिटणा-यांनी गोरगरिब मुलीची शैक्षणिक विकास केला तरी भरपुर होईल.