बालवयात झालेले श्रमसंस्कार जीवन घडवितात: काकासाहेब शिंदे
भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये स्काऊट गाईड खरी कमाई सेवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकरराव टेकणे हे होते.
या निमित्ताने भरविण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खादय पदार्थ स्वतः बनवून विक्रीचे स्टॉल सजवले होते.आकर्षक जाहिरातीही लावल्या होत्या.आपल्याच वर्गमित्रांनी बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा विद्यार्थ्यांनी अस्वाद घेतला .कार्यक्रमाचे प्रास्तविक साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी केले. राणी स्वामी , स्काऊट शिक्षक विजय मोरे यांनी स्काऊटविषयी माहिती दिली. कार्यक्रमास अशोक मिसाळ, अॅड. सुनील शिंदे, बाळकृष्ण पुरोहित, रमेश पाडळे ,कवी डॉ. संतोष तागड, अर्जुन गायकवाड उपस्थित होते सूत्रसंचालन उपप्राचार्य दीपक राऊत यांनी केले. सोपान नरोटे यांनी आभार मानले.
