मुंबई : नालासोपार्यामध्ये पाण्याच्या टँकरने दोन मुलांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आली आहे. नालासोपार्यातील लालाभाई कंपाऊंड येथील वळणावर हा अपघात झाला आहे. या अपघातात अनिरुद्ध कदम या मुलाला गंभीर दुखापत झाली असून या घटनेत अन्य मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. रस्त्याच्या कडेला 2 मुले पायी चालत असताना समोरुन येणार्या पाण्याच्या टँकरने त्यांना धडक दिली. या मुलांवर सध्या रुग्णालायात उपचार सुरू आहे. प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपार्यात पाण्याच्या टँकरने दोन मुलांना चिरडले
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:00
Rating: 5