Breaking News

आठ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्ये वाढू शकते नैराश्य.

न्यूयॉर्क : रात्री वेळी कमी झोप घेणाऱ्या लोकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण रात्री आठ तासांपेक्षा कमी काळ झोप मिळत असलेल्या लोकांना नैराश्याचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा एका ताज्या अध्ययनातून देण्यात आला आहे. अमेरिकेतील ब्रिंघमटन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लोकांच्या झोपण्याचा कालावधी आणि हलकी ते गाठ झोप घेतेवेळी त्यांच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांचे मूल्यांकन केले. 


त्यात त्यांना असे आढळून आले की, नियमितपणे झोपेत अडथळा येण्याचा संबंध नकारात्मक विचार येण्यासोबत असू शकतो. या अध्ययनात सहभागी केलेल्या लोकांवर केलेल्या पाहणीच्या आधारे शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या लोकांच्या झोपेदरम्यान भावनात्मक प्रतिक्रिया आणि डोळ्यांच्या हालचालींवर शास्त्रज्ञांनी नजर ठेवली. या अध्ययनाचे प्रमुख मेरिडिथ कोल्स यांनी सांगितले की, झोपेमध्ये येणाऱ्या अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांची समस्या असलेल्या लोकांमध्ये नैराश्यक व व्यग्रता यांसारख्या विविध प्रकारचे मानसिक विकार होण्याचा धोका वाढू शकतो. या नकारात्मक विचारांना चिंता वा नैराश्याप्रती संवेदनशील जोड मानले जाते, असेही त्यांनी सांगितले.