Breaking News

महासंघाला ओलीस ठेवणार्‍यांना समाजाचा इशारा

5 मार्च रोजी कुंभार समाजाची अस्मिता आणि स्वाभिमान म्हणविणार्‍या मोर्चाचे पुराण महाराष्ट्रभर चवीने चर्चिले जात आहे. या मोर्चाचे आवाहन करणारे पुढारी कसे ढोंगी आहेत, समाजाच्या नावावर स्वतःचे पोटभरण्यासाठी समाजाला वेठीस धरण्यासाठी कसे ‘अधीर’ झाले आहेत. मोर्चा काढून आपल्या आयुष्याची ‘चांदी’ करण्याचा या मंडळींचा कसा डाव आहे याची चर्चा सोशल मिडीयांतून जोरात सुरू झाली आहे.

ज्या महासंघाच्या नावावर हा मोर्चा आयोजित केला जात आहे, तो महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ कुणी स्थापन केला, या महासंघाशी या मोर्चेकरी कथित पुढार्‍यांचा संबंध काय, महासंघाच्या नावावर या मंडळीनी समाजाची कशी दिशाभूल केली, याचा हिशेब मांडून समाजबांधव या भामट्यांना जाब विचारीत आहेत. सोशल मिडीयावर अनेक कुंभार बांधव आपल्या भावना प्रगट करू लागले आहेत. त्यांपैकी काही भावना समाज बांधवांच्याच शब्दात प्रसिध्द करीत आहोत.

- चांदेकरांनी महासंघाचा इतिहास उस्तरू नये
मा. अशोक सोनवणे साहेब अहमदनगर व मा.वामन महाराज शिंदे, ठाणे यांनी महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाज बांधवांना एकत्रित करण्याचे प्रथम काम केले. महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाची स्थापना त्यांनी केली. मा. अशोक सोनवणे साहेब पहिले महासंघाचे सचिव होते. महासंघाची 1997 साली पुणे येथे नोंदणी केल्यानंतर सुधीर चांदेकर सचिव झाले. अशोक सोनावणे यांना डावलून महासंघाचा इतिहास सुधीर चांदेकर लिहू पाहत आहेत. ते शक्य नाही. त्यांचा व इतर जुन्या पदाधिकारी यांंचा विचार न घेता कुंभार समाजासाठी घातक असणारे निर्णय 5 मार्च रोजी मोर्चा काढून घेतले जात आहेत. अशोक सोनवणे साहेब लोकमंथनचे संपादक आहेत. त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे कुंभार समाजाची बाजू अनेक वर्षांपासून मांडली आहे. कुणीही सांगावे अशोक सोनवणे यांनी कुंभार समाजाचा एक पैसा खाल्ला असेल तर. सुधीर चांदेकर साहेब हे गेली 20 वर्ष महासंघाचे सचिव आहेत. महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात राहाणार्‍या कुंभार समाजातील समाज बांधवांनची नेतृत्त्व करणारी संघटना आहे. महासंघाची घटना प्रथम सर्वांनी समजून घेणे जरुरीचे आहे असे मला वाटते. सध्या महासंघात पदांचा बाजार चाललेला दिसत आहे. महासंघावर वैयक्तिक सभासद होता येत नाही. राज्यात असणार्‍या संस्था आपला एक प्रतिनिधी महासंघावर पाठविल व पाच हजार रूपये सभासद फी भरून संस्था सभासद होईल. पण व्यक्तीला सभासद होता येत नाही. परंतु घटनेला डावलून व्यक्तीला सभासद केले जात आहे असे दिसून येत आहेे. अशा कुंभार समाजाच्या किती संस्था आहेत की त्यांनी पाच हजार रूपये भरून महासंघाचे सभासदत्व मिळवलेले आहे. त्या संस्थांनी भरलेले पैसे महासंघाच्या नावाने कोणत्या बँकेत सुधीर चांदेकर साहेब यांनी ठेवलेले आहेत याची माहिती महाराष्ट्रातील कुंभार समाजाला प्रथम दयायलाच हवी. महासंघाचे स्वःताचे कार्यालय आहे का? जर नाही तर इतके वर्ष सुधीर चांदेकर साहेब यांनी त्यासाठी वैयक्तिक काय प्रयत्न केले. आज 50 समाजबांधव बसतील इतकी जागा सुधीर चांदेकर साहेबांना समाजासाठी घेता आली नाही. कुंभकार दर्शन मासिक आमच्या कार्यकाळात चालवता येत नाही म्हणून बंद केले होते. ते सुधीर चांदेकर यांनी आमचा सल्ला न घेता चालू केले. त्या मासिकाच्या सर्व प्रति आमच्याकडे आहेत. त्याच्या जाहिरातींचे घेतलेले दर ही आमच्याकडे आहेत. योग्य वेळी आम्ही समाजाला ते दाखवणारच आहोत. जाहिरातींच्या लाखो रुपयांचा हिशोब पुणे धर्मदाय कार्यालयाला सुधीर चांदेकर साहेबांनी अजून पर्यंत का दिला नाही? महासंघाला आज पर्यंत पावती रुपाने किती पैसे मिळाले? आजपर्यंत झालेले आंदोलन व मेळावे यासाठी पैसे कोण खर्च करतात त्यांची नावे कुंभार समाजाला समजलीच पाहिजेत. सुधीर चांदेकर साहेब हे त्यांचा चुलत भाऊ मा.ज्ञानेश्‍वर चांदेकर साहेब यांचे होऊ शकले नाही. ज्ञानेश्‍वर चांदेकर साहेब यांना महासंघाचे सचिव पद सोलापूर जिल्ह्यातील मिटिंग मध्ये ठराव करून मा.सुरेश हिरे साहेब, अध्यक्ष व ज्ञानेश्‍वर चांदेकर साहेब सचिव म्हणून निवड झाली होती. असे असतांनाही आजही सचिव पद सुधीर चांदेकर साहेब यांनी का सोडले नाही? ज्ञानेश्‍वर चांदेकर यांना सचिव पद न दिल्यामुळेच आम्ही सर्व पदाधिकार्‍यांनी महासंघाच्या पदाधिकारी बदलास आज पर्यंत मान्यता दिलेली नाही व बदलासाठी विठ्ठलराव राऊत यांच्या सांगण्यावरून कोठेही सही केलेली नाही. जो माणूस भोर जि. पुणे येथील कार्यक्रमात आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसमोर उघडपणे दारू पिऊ शकतो ती मुले त्यांना जाहीरपणे लहरश्रश्रशपसश ........करु लागलेली आहेत. अश्या सुधीर चांदेकर साहेबांचा कुंभार समाजातील युवकांनी महासंघाचे सचिव म्हणून काय आर्दश डोळ्यासमोर ठेवावा? कार्यक्रमाला गेल्यानंतर मानपाण व दारू पाण्याची सोय होण्यासाठीच ते सचिव पदाला आम्हा सर्व पदाधिकार्‍यांना बाजूला करून चिकटून राहिलेले आहेत. परंतु आम्ही सर्व पदाधिकारी यापुढे त्यांची ही दादागिरी सहन करणार नाही. आत्ता वेळ आली आहे गप्प बसून चालणार नाही. आज सुधीर चांदेकर साहेब यांच्या कार्य पद्धत्तीवर कुंभार समाजात चर्चा ही झालीच पाहिजे. आज समाजाने चुकीच्या गोष्टीं विरोधात आवाज नाही उठवला तर पुढे कधीच आवाज उठवला जाणार नाही व समाज चुकीच्या लोकांच्या पाठीमागे लागून कुंभार समाज असाच भरकटत राहील व असे झाल्यास समाजाचा उद्धार होणे कदापि शक्य नाही. म्हणून मा. अशोक सोनवणे साहेब यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील कुंभार समाजाने आज रोजी ठामपणे उभे राहाणे गरजेचे आहे. महासंघाचे खरे चित्र आज आपल्या समोर स्पष्ट केले आहे की सुधीर चांदेकर यांनी माझ्या सहित मयत झालेल्या महासंघाच्या सदस्यांच्या खोटया सहया मारलेल्या आहेत. महासंघात जे काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत त्यांना नियुक्त करतांना आम्हा सदस्यांना मिटिंग लावून विश्‍वासात घेतले गेलेले नव्हते. महासंघ आमच्यासाठी एक घरा समान आहेे. त्या आमच्या घरातून आम्हालाच सुधीर चांदेकर साहेबांसमोर पैठण येथून ज्यांचा महासंघाचे पदाधिकारी म्हणून काही संबंध नाही अश्या समाजबांधवांनी गैरसमजूतीतून मंचावरून खाली उतरवले होते. त्यावेळेस सुधीर चांदेकर साहेब झालेला प्रकार रोकू शकत होते किंवा आमच्यासोबत मंचावरून खाली उतरू शकत होते. पण त्यांनी मंचावर बसून राहणे पसंत केले. पुणे येथे समाजाला एकत्रित करण्याचा त्यांनी दिलेला शब्द त्यांना पैठणला पाळता आला नाही व त्यातूनच कुंभार समाजाचे आज चाललेले महाभारत उभे राहिले आहे. आमचे कुंभार समाजा समोर उतारवयात हासे केले. या सर्व प्रकाराला सुधीर चांदेकर ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे असे आम्ही समजतो. विठ्ठलराव राऊत साहेब हे नोंदणीकृत अध्यक्ष आहेत. ते महासंघाचे बापच आहेत. ते पैठण येथे महासंघ कोणाच्या बापाचा नाही म्हणून चिडून बोलले होते. सहजासहजी ते कोणावरही रागवत नाहीत परंतु चुकीचा प्रकार घडला म्हणून ते रागावले म्हणून त्यांचा राग येऊन मंचावरून त्यांना खाली जबरदस्ती उतरवून दिले. ते आमच्यासाठी अध्यक्ष या नात्याने आजही बापच आहेत. ज्यांना कुणाला गैर वाटत असेल त्यांनी नवीन महासंघ बुलढाणा जिल्हयात नोंदणीकृत करावा. आमचा त्यांना विरोध राहाणार नाही. चुकीचे काम केले म्हणून आम्ही सुधीर चांदेकर साहेब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असा वकिलांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यात महासंघाच्या नावाचा वापर विठ्ठलराव राऊत यांना विचारल्याशिवाय कुणीही करू नये. या सगळ्या प्रकारात सामान्य कुंभार समाज भरडला जाऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. अशोक सोनवणे साहेबांनी लोकमंथन वर्तमानपत्राद्वारे महाराष्ट्र शासनाला सर्व प्रकार कळवलेला आहे. तरी 5 मार्चसाठी महासंघाच्या नावाचा गैरवापर करू नये ही विनंती. शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. माझ्या पोस्ट विषयी चांगल्या वाईट प्रतिक्रिया जरूर देणे ही नम्र विनंती. 
- आपला
रंगनाथ हरी सूर्यवंशी
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ सदस्य


राजकीय स्वार्थासाठी मोर्चाचे आयोजन
मा.श्री.रंगनाथजी सुर्यवंशी साहेब आपण महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, पुणे या संघटनेची खरी माहिती महाराष्ट्रातील कुंभार समाजा समोर ठेवली आहे. आपण केलेल्या लिखाणाला 5 मार्च रोजी होणार्‍या आंदोलनासाठी सूट बुट घालून स्वतःला महासंघाचे पदाधिकारी व नेते तसेच तारणहार आसल्याचे दाखवून सोशल मिडियावर मोठ मोठया जाहिराती अनेक दिवसांपासून करताना दिसत आहेत. त्यांनी एकानेही सोशल मीडियावर आपल्या लिखाणाला विरोध केलेला दिसण्यात येत नाही. याचाच अर्थ आपण केलेले लिखाण शंभर टक्के खरे आहे हे स्पष्ठ होत आहे. अनेक कुंभार समाजातील तरुणांनी जे महासंघाचे पदाधिकारी नसणार्‍या बेगडी नेत्यांच्या पाठिमागे लागून अनेक वर्षांपासून वेळ व पैसा वाया घालवला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितले की सर्यवंशी साहेबांनी महासंघाविषयी केलेले खरे लिखाण वाचून त्यांचे खडबडून डोळे उघडले आहेत. आज पर्यंत राजकीय नेते निवडणूकीत निवडून येण्यासाठी आपल्या सख्या भावाशी राजकारण करतांना त्यांनी पाहिले होते. परंतु कुंभार समाजात सामाजिक काम करणारे व स्वतःला महासंघाचे नेते म्हणून घेणारे सख्या चुलत भावाला व पदाधिकारी यांना संपवून आपले नाव कसे मोठे होईल यासाठी धडपड करताना त्यांनी महासंघात बेगडी पदाधिकारी पाहिले आहे. त्यांना गरीब कुंभार समाजाशी काही देणे घेणे दिसत नाही. महासंघाचे बेगडी पदाधिकारी 5 मार्चचे आंदोलन फक्त आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच करत असल्याचे त्यांची पूर्णपणे खात्री झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. मा.श्री.अशोकजी सोनवणे साहेब यांनी कुंभार समाजासाठी दिलेले योगदान ही आपण समाजा पुढे चांगल्या प्रकारे ठेवले. त्यामुळे त्यांनी राज्यात व देशात कुंभार समाजासाठी केलेल्या कामाला आपण समाजापुढे आणून त्यांना व त्यांच्या कामाला न्याय मिळवून दिला आहे. सूर्यवंशी साहेब आपण भरकटलेल्या समाज बांधवांचे डोळे खडाडून ऊघडल्या बद्दल आपल्याला कुंभार समाजातील समाज बांधवांच्यावतीने लाख लाख धन्यवाद.


- आपला
योगेश हिवरकर
कुंभार समाजबांधव